मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मानदुखीचा त्रास; रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीबाबत मोठी माहिती समोर येत आहेत. त्यांना पाठीचा मणका आणि मानेच्या स्नायूंच्या दुखपतीचा त्रास बळावला आहे. गेल्या आठवड्यापासून त्यांना हा त्रास होत आहे त्यामुळे उद्धव ठाकरे हे रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता आहे. दरम्यान, याबाबत अद्याप अधिकृत माहिती पुढे आली नाही.

उद्धव ठाकरे यांना मागील काही दिवसांपासून मणका आणि मानेच्या स्नायूंचा त्रास होत आहे. त्यासाठी त्यांनी गेल्या सोमवारी गिरगावातील सर एच. एन. रिलायन्स हॉस्पिटलमध्ये आरोग्य तपासणी केली होती.मागील अनेक दिवसांपासून हा त्रास जाणवत असल्यामुळे ठाकरे यांनी भेटीगाठी टाळल्या आहेत. त्यांनी दिवाळीनिमित्त वर्षाबंगल्यावर पाहुण्यांकडून शुभेच्छा घेणेदेखील टाळले होते.

दरम्यान, पंढरपूर येथील कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रास्ताविक भाषण केले. या वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उल्लेख करताना ‘प्रकृती बरी नसतानाही मुख्यमंत्री या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहिले’ असा उल्लेख केला. गडकरी यांच्या या माहितीमुळे उपस्थितांमध्ये काळजीचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, थोड्याच वेळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मानेला पट्टा लावून भाषण करताना दिसले

Leave a Comment