महाराष्ट्रात लॉकडाउन अजून वाढणार का?; मुख्यमंत्र्यांनी केलं ‘हे’ विधान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडक लॉकडाऊन लागू करण्यात आले असून त्याचच यश म्हणून राज्यात गेल्या 2-3 दिवसापासून रुग्णसंख्येत काही प्रमाणात घट दिसून आली. त्यामुळे आता पुन्हा लॉकडाउन होणार की थोड्या प्रमाणात शिथिलता मिळणार याकडे राज्यातील जनतेचं लक्ष लागून राहील आहे. त्यातच आता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाउनसंबंधी महत्वाचं विधान केलं आहे. ते रत्नागिरीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

उद्धव ठाकरे म्हणाले की, “करोना कमी होतोय हे नक्कीच पण गेल्या लाटेच्या वेळी आपण अनुभव घेतला आहेय गेल्यावेळीही आपण करोनावर नियंत्रण मिळवलं होतं. पण थोडीशी शिथिलता आली आणि कोविड चौपटीने वाढला”.सध्या गेल्या वेळच्या तुलनेत वाईट परिस्थिती आहे हे लक्षात घेतल्यानंतर पुढे कधी आपण निर्बंध शिथील करु तेव्हा मागील अनुभवातून शहाणं व्हावं लागेल. सुरक्षेचे नियम पाळावेच लागतील,” असंही ते म्हणाले

सध्याच्या परिस्थितीत लॉकडाउन वाढणार का असं विचारण्यात आलं असता उद्धव ठाकरे म्हणाले की, सध्याचा करोना विषाणू फार घातक आहे, अत्यंत वेगाने पसरतो. काही पटींमध्ये लोकांना हा बाधित करत आहे. सध्या परिस्थिती आटोक्यात असून त्यानुसार लॉकडाऊनचा नंतर निर्णय घेऊ.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment