Sunday, February 5, 2023

मिठागरात मिठाचा खडा टाकू नका , मुंबईकरांच्या हिताचे जे काही असेल ते टीकेची पर्वा न करता ते करणारच ;उद्धव ठाकरेंनी विरोधकांना सुनावलं

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | “मुंबई मेट्रोची आरे कारशेडची जागा कांजूरमार्गला हलवण्यावरून विरोधकांकडून टीका करण्यात येत आहेत. विरोधकांकडून मिठाघराची जमीन आहे असं सांगून प्रकल्पात मीठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. प्रकल्पात कोणीही मीठाचा खडा टाकू नका. कोणत्याही टीकेची चिंता न करता यावर आम्ही काम करत राहू,” असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना टोला लगावला.दिवाळी निमित्त आज उद्धव ठाकरेंनी जनतेशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते.

काहीजण ती जमीन मिठागराची आहे, असं म्हणत आहेत, पण ती जर मिठागराची जमीन आहे, असे म्हणणाऱ्यांना एक कळत तुम्ही मुंबईकरांच्या प्रोजेक्टमध्ये मिठाचा खडा टाकत आहात. आरेची कारशेड कांजूरमार्गला नेली त्यावर सर्व उत्तर आपल्याकडे आहेत. हे सर्व जे टीका करतात त्यांना समर्पक उत्तर देऊ,” असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

मिठाचा खड्याचा इलाज काय करायचा तो करु. पण आम्ही सुद्धा डोळे बंद करुन काही काम करत नाही. जे काही मुंबईकरांच्या हिताचे असेल ते टीकेची पर्वा न करता ते करणार म्हणजे करणारचं. कोणत्याही परिस्थिती करु, असेही उद्धव ठाकरेंनी सांगितले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’