देशातील अन्नदात्याला देशद्रोही ठरवणं आपल्या संस्कृतीत बसत नाही ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे भाजपला खडेबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील अन्नदात्याला देशद्रोही आणि अतिरेकी ठरवणं आपल्या संस्कृतीत बसत नाही… असं वक्तव्य करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला. शिवाय शेतकऱ्यांच्या हक्कांबद्दल कोणी आवाज उठवला तर ते देशद्रोही. विरोधात बोललं आणि तुरुंगात टाकणं ही आणीबाणी नाही का? असा प्रश्न यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला. सध्या देशभरात कृषी विधेयकावरून शेतकरी आणि केंद्र सरकार मध्ये वाद चालला आहे या पार्श्वभूमीवर त्यांनी हे भाष्य केलं.

कामगार कायदे, कृषी कायदे करून कामगारांची, शेतकऱ्यांची गळचेपी करण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. पण न्याय्यहक्कासाठी कोणी बोलले की त्याला देशद्रोही ठरवले जाते. शेतकरी आंदोलनाबाबत भाजपच्या नेत्यांनी एक काय ते ठरवावे. कधी शेतकरी आंदोलकांना डावे म्हटले जाते, कधी खलिस्तानी म्हटले जाते, कधी पाकिस्तान व चीनचे पाठबळ असल्याचे सांगतात. न्याय्यहक्कासाठी आंदोलन करणाऱ्या अन्नदात्या शेतकऱ्याला देशद्रोही ठरवणे हे आपल्या संस्कृतीत बसत नाही. देशातील जागरूक जनता हे सर्व बघत असून त्यांच्या सहनशक्तीचा अंत बघू नये. असला तुघलकी कारभार देशातील जनता सहन करणार नाही, असे ठाकरे यांनी सुनावले. शेतकऱ्यांच्या हिताची नसलेली कृषी कायद्यांतील एकही गोष्ट महाविकास आघाडी सरकार स्वीकारणार नाही, असेही ठाकरे यांनी जाहीर केले.

दरम्यान, शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवायचे आणि पाकिस्तानातून कांदे-साखर आयात करायचे काम केंद्रातील भाजप सरकार करत असल्याची बोचरी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. तसेच राज्यातील भाजप नेत्यांनी घेतलेली पत्रकार परिषद मीसुद्धा पाहिली. भाजप नेत्यांचे चेहरे पडलेले आहेत. त्यांच्या पत्रकार परिषदेत उत्साह नव्हता, असे म्हणत अजित पवार यांनी विरोधकांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेचा तसेच त्यांचा आरोपांचा समाचार घेतला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment