महाराष्ट्राला २० कोटी लसींची गरज ; मुख्यमंत्र्यांची आदर पुनवाल्यांशी चर्चा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : केंद्र सरकारने महिनाभर अगोदरच रेमडिसिव्हरचे बुकिंग केले असल्यामुळे राज्य सरकारला अजून एक महिना तरी लसींसाठी वाट पाहावी लागणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. राजेश टोपे यांनी नुकतीच दिली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिरमचे प्रमुख अदर पुनावाला यांच्याशी कोव्हीशिल्ड लस मिळवण्यासाठी चर्चा केली. यावेळी महाराष्ट्राला 20 कोटी लसींची गरज आहे. 18 वर्षांवरील नागरिकांना लसीकरणाची मुभा दिल्यामुळे 5.5 कोटी लसीची गरज नव्याने निर्माण झाली आहे.  

सध्या कोरोना लसीच्या तुटवड्यामुळे महाराष्ट्रातील अनेक लसीकरण केंद्र बंद पडली आहेत. अशा परिस्थितीत आता केंद्र सरकारच्या नव्या नियमानुसार प्रत्येक राज्याला 50 टक्के लसींचा साठा हा थेट लसनिर्मात्या कंपन्यांशी बोलणी करुन विकत घ्यावा लागणार आहे. त्या दृष्टीने महाराष्ट्रासाठी लस खरेदी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिरम इन्सिट्यूटकडून कोव्हीशिल्ड लस मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी ऑनलाईन द्वारे पार पडलेल्या चर्चेवेळी सीरम इन्स्टिट्यूटच्या अदर पुनावाला यांनी सांगिंतलं की, येत्या दोन महिन्यात आम्ही लसीचे उत्पादन वाढवणार आहोत. सीरम इन्स्टिट्यूटच्या उत्पादन क्षमतेच्या एकूण 50 टक्के लसी या भारत सरकारला देण्यात येतील तर 50 टक्के लसी राज्य सरकार आणि खासगी हॉस्पिटलना देण्यात येतील. सिरमचे सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्ड लसीचा एक डोस सरकारी हॉस्पिटलसाठी 400 रुपयांना तर खासगी हॉस्पिटलसाठी 600 रुपयांना उपलब्ध करण्यात येईल.

Leave a Comment