भांडूप आगप्रकरणाची चौकशी करून दोषी आढळल्यास कारवाई करणार – मुख्यमंत्र्यांची ग्वाही

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भांडूपमधील ड्रीम्स मॉलला आग लागल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री घडली. या आगीत दहा जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घटनास्थळी दाखल झाले आहेत. महापालिकेचे अधिकारी आणि पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माहिती घेतली. या घटनेची चौकशी करण्यात येणार असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखाची आर्थिक मदत करणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं

कोरोना संकटामुळे तात्काळ उपचारासाठी राज्यात रुग्णालये आणि कोविड सेंटर उभारण्याची परवानगी देण्यात आली होती. त्याली हे मॉलमधलं हॉस्पिटल आहे. राज्यभर जिथे शक्य तिथे कोव्हिड हॉस्पिटल्सना परवानगी दिली होती. या हॉस्पिटलला तात्पुरती परवानगी होती. येत्या 31 तारखेला संपत होती. दुर्दैवाने हॉस्पिटलच्या खाली असलेल्या दुकान, तळमजल्यांना आग लागली. ती हॉस्पिटलपर्यंत आली. जे कोरोना रुग्ण अॅडमिट होते, त्यातील बाहेर काढताना काहींचा मृत्यू झाला. अशा घटना झाल्यानंतर आपण जागे होतो, चौकशी होते… या प्रकरणातही चौकशी करुन कारवाई करु असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

दरम्यान, मुख्यमंत्री ठाकरे यांनी आगीत होरपळून मृत्यू झालेल्या मृतांच्या कुटुंबीयांची माफी देखील मागितली. व्हेंटिलेटरवर असणाऱ्या रुग्णांचा या दुर्घटनेत अधिक मृत्यू झाला असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. अशावेळी व्हेंटिलेटर बंद करणं किंवा त्याबाबत योग्य निर्णय घेणं कठिण असतंस असंही ते म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मृतांच्या कुटुंबीयांकडे दिलगिरी व्यक्त केली असून या आगीत मृत्यूमुखी पडलेल्या मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदतही त्यांनी जाहीर केली आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment