उद्धव ठाकरेंचे पंतप्रधान मोदींना पत्र; केली ‘ही’ मोठी मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. महाराष्ट्रातून जाणाऱ्या प्रस्तावित हायस्पीड रेल्वे, तसेच नागपूर- मुंबई हायस्पीड रेल्वेबाबत हे पत्र लिहिलं आहे.  तसेच पुणे आणि औरंगाबाद दरम्यानही हायस्पीड मार्ग देखील असणे आवश्यक आहे. दरम्यान, या पत्रात दोन बुलेट ट्रेन्सचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदी यांना दिला आहे.

नागपूर-नाशिक-मुंबई ही एक बुलेट ट्रेन करण्यात यावी. तसंच समृद्धी महामार्गाला नांदेडवरुन जालना असा मार्गही जोडला जाणार आहे, तोच मार्ग औरंगाबाद पुणे मुंबई असा करण्यात यावा आणि नांदेडवरुन तो मार्ग पुढे हैद्राबादला जोडला जावा आणि हैद्राबाद नागपूर मुंबई अशी एक बुलेट ट्रेन करण्यात यावी, असा प्रस्ताव पंतप्रधानांना दिलेला आहे.

महाराष्ट्र सरकारने जालना आणि नांदेड दरम्यान एक्स्प्रेस वेला आधीच मान्यता दिली आहे. तर दुसरीकडे NHAI ने आधीच नांदेड ते हैदराबाद एक्सप्रेस वेची योजना आखली आहे. हायस्पीड रेलला सामावून घेण्याचे समान तर्क लावल्यास नागपूर आणि मुंबई, मुंबई-हैदराबाद हायस्पीड रेलचे नियोजन जालना मार्गे मुंबई-नांदेडच्या बाजूनेही करता येईल आणि पुढे प्रस्तावित नांदेड आणि हैदराबाद एक्स्प्रेस वे च्या RoW मध्ये नेता येईल. असे मुख्यमंत्र्यांनी म्हंटल.

You might also like