महाराष्ट्राला 3 कोटी जादा डोस द्या; उद्धव ठाकरेंची मोदींकडे मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्र शासनाने देशातील सहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बैठक आयोजित केली होती, त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती बाबत बोलताना मोदींकडे 3 कोटी लसींची मागणी केली आहे. तसेच संपूर्ण देशभरात वाढणारी गर्दी पाहता केंद्रीय पातळीवरून काही व्यापक स्वरूपाचे धोरण आखावे अशी विनंती केली.

दुसऱ्या लाटेचे शेपूट देखील अद्याप वळवळते आहे. त्यातच कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करताना वाढणारी गर्दी हे एक मोठे आव्हान आहे. या दृष्टीने विविध धार्मिक, सामाजिक आणि राजकीय कारणांसाठी होणारी गर्दी थांबविण्यासाठी, केंद्र सरकारनेच आता त्यांच्या स्तरावरून देशपातळीवर व्यापक धोरण आणावे अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे.

सध्या पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील मिळून ८ ते १० जिल्ह्यांमध्ये अध्यापही संसर्ग आहे. या जिल्ह्यांमधील १८ वर्षांपुढील २.०६ कोटी जणांना पूर्ण दोन्ही डोस देणे गरजेचे आहे. सध्या ८७.९० लाख डोस इथे दिले आहेत. त्यामुळे जादाचे ३ कोटी डोस मिळाले तर प्राधान्याने या सर्व जिल्ह्यांत संपूर्ण लसीकरण करता येईल असे मुख्यमंत्र्यांनी म्हंटल.

Leave a Comment