सावरकर शब्द उच्चारण्याची तुमची लायकी तरी आहे का? मुख्यमंत्र्यांचा भाजपवर प्रहार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात विविध मुद्द्यांवरून भाजपवर जोरदार प्रहार केला. सावरकर शब्द उच्चारण्याची तुमची लायकी तरी आहे का? गांधी हा शब्द उच्चारण्याची लायकी तरी आहे का? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला. हिंदुत्वाला धोका होता तेव्हा एकच मर्द बाळासाहेब ठाकरे हे हिंदुत्वाच्या दुश्मनांसमोर उभा राहिला होता, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हंटल.

भाजपला गांधी आणि सावरकर तरी समजले का? असा सवाल करतानाच मी दोन वर्षापूर्वी बोललो होतो. माय मरो आणि गाय जगो हे आमचे हिंदुत्व नाही. त्यावेळी गहजब माजला होता. झुंडबळी झुंडबळी अशी बोंब ठोकली. त्यावेळी मोहन भागवत म्हणाले झुंडबळी घेणारे हे हिंदूच नाहीत. मग हे हिंदुत्व आहे तरी काय? कोणी शिकवायचं? कुणाला शिकवायचं? आणि कोणाकडून शिकायचं? हिंदुत्वाला धोका नाही हे सत्य असेल तर हिंदुत्वाला धोका होता तेव्हा एकच मर्द बाळासाहेब ठाकरे हे हिंदुत्वाच्या दुश्मनांसमोर उभा राहिला होता, असंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा, आजपण सांगतो मी. पण तसं करून पडत नाही. मग आपल्याकडे जसा छापा की काटा खेळ आहे, तसा छापा टाकायचा आणि काटा काढायचा. छापा की काटा? मग तिकडून विचारतात टाकला छापा, काढला काटा? ही थेरं जास्त चालू नाही शकत.” असं देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलून दाखवलं.

You might also like