राज्यपालांचा वाढदिवस!! शुभेच्छा देण्यासाठी मुख्यमंत्री राजभवनावर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचा आज 79 वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी राजभवनावर दाखल झाले. मुख्यमंत्र्यांनी पुष्पगुच्छ देऊन राज्यपालांना शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते.

मुख्यमंत्री राजभवनावर पोहोचण्यापूर्वी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर सर्वात आधी राजभवानावर पोहोचले होते. मिलिंद नार्वेकर यांनी सकाळी 9.30 ला राजभवनावर जाऊन राज्यपालांना शुभेच्छा दिल्या. मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरे यांचे अत्यंत जवळचे आहेत हे सर्वश्रुत आहेत.

दरम्यान राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यापासून राज्यपाल विरुद्ध महाविकास आघाडी सरकार असं चित्र पाहायला मिळत होतं. त्यात मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यात पत्रावरुनही संघर्ष झालेला होता. त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने राज्यपालांची भेट घेऊन हा तणाव काहीसा निवळण्याचा प्रयत्न केला, असं मत राजकीय विश्लेषक मांडत आहेत.

Leave a Comment