कोल इंडिया कोळशाच्या किंमती 11 टक्क्यांपर्यंत वाढवणार, यामागील कारण जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । खाण क्षेत्रातील आघाडीची कंपनी कोल इंडिया लिमिटेड (Coal India Ltd.) कोळशाच्या किंमती वाढवण्याची घोषणा करू शकते. किंबहुना, वाढीव खर्च आणि वेतनातील प्रलंबित बदलांचा (Cost & Salary Hike) परिणाम कमी करण्यासाठी कंपनी कोरड्या इंधनाच्या किंमती किमान 10-11 टक्क्यांनी वाढवू शकते. कोलकातास्थित खाण कंपनीने 2018 मध्ये कोळशाच्या किंमतीमध्ये शेवटची वाढ केली होती. त्याची सध्याची सरासरी नियमन केलेली किंमत (Average Regulated Price) वसुली 1,394 रुपये प्रति टन आहे.

अनेक वर्षांपासून कोळशाची किंमत का वाढवली नाही?
इंधन पुरवठा कराराअंतर्गत (Fuel Supply Agreement) गेल्या काही वर्षांपासून कोळशाच्या किंमतीत कोणतीही वाढ झालेली नाही. सर्वत्र वेतन बदलल्यामुळे खर्च वाढल्याचे सूत्रांनी सांगितले. अशा परिस्थितीत एकूण उत्पन्नात घट टाळण्यासाठी कोळशाच्या किंमती किमान 10-11 टक्क्यांनी वाढवण्याची गरज आहे. ते म्हणाले की,” कोल इंडियाने बोर्डाच्या सदस्यांशी अनौपचारिक चर्चा केली आहे.”

बोर्डाच्या सदस्यांनी दरवाढीची गरज स्वीकारली
कोल इंडियाच्या बहुतेक बोर्डाच्या सदस्यांनी कोळशाच्या किंमती वाढवण्याची गरज मान्य केली आहे. यापूर्वी, कोल इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक प्रमोद अग्रवाल यांनी अलीकडेच म्हटले होते की,”कंपनीचा खर्च वाढला आहे. त्यामुळे कोरड्या इंधनाच्या किंमती वाढवू नयेत असे काही कारण नाही.” ते म्हणाले होते की,” कंपनी कोळशाच्या किंमती वाढवण्याचा विचार करत आहे.”

Leave a Comment