‘आय क्विट’ म्हणत 21 वर्षीय तरुणाने केली आत्महत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | औरंगाबाद येथील सातारा परिसरात वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या एका वैद्यकीय शिक्षण (बीडीएस) घेत असलेल्या एका २१ वर्षीय तरुणाने ऑनलाइन लेक्चर सुरू असतानाच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सातारा परिसरात मंगळवारी दुपारी १२ वाजता ही घटना घडली. सागर महेंद्र कुलकर्णी असे मृताचे नाव आहे. महिन्यावर सागरची परीक्षा आली हाेती. त्यामुळे सकाळी वडिलांशी गप्पा मारताना आपण चांगला अभ्यास करत असल्याचे त्याने सांगितले हाेते.

पण काही तासाने त्याने‘आई-बाबा बाय, आय क्विट’ अशी चिठ्ठी लिहून ठेवत त्याची जीवनयात्रा संपवली. मागील दोन दिवसात वेगवेगळ्या कारणांमुळे तणावग्रस्त असलेल्या चार तरुणांनी अशीच जीवनयात्रा संपवली त्याचबरोबर ३५ वर्षांखालील १६ जणांनी दीड महिन्यात आत्महत्या केल्याची माहिती समाेर आली आहे. औरंगाबादेतील सातारा परिसरातील ज्योती प्राइडमध्ये कुटुंबीयांसह राहत होता. त्याची आई गृहिणी, वडील घाटी रुग्णालयात प्रयोगशाळा सहायक तर मोठा भाऊ पुण्याला नोकरी करतो. तीन वर्षांपासून लातूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये तो बीडीएसचे शिक्षण घेत होता.

मागील दीड वर्षापासून लॉकडाऊनमुळे ताे औरंगाबादेत घरी बसून ऑनलाइन लेक्चरद्वारे अभ्यास करत हाेता. गेल्या काही महिन्यांतच त्याला स्किझोफ्रेनिया आजाराची लक्षणे आढळून आली होती. त्यामुळे मानसोपचारतज्ज्ञाकडे उपचारदेखील सुरू होते. मंगळवारी सकाळी वडिलांनी त्याला औषधे दिली. तसेच गप्पा मारत त्याच्यासाेबत चहासुद्धा घेतला. त्या वेळी ‘बाबा, चाळीस दिवसांवर माझी परीक्षा आली आहे, पण तुम्ही काळजी करू नका. मी चांगली तयारी करताेय,’ असे सांगून ताे आपल्या खाेलीत निघून गेला. आता ऑनलाइन लेक्चर सुरू हाेणार असल्याचेही त्याने सांगितले हाेते. साडेअकरा वाजेच्या सुमारास जेवणासाठी त्याच्या आईने त्याला आवाज दिला. पण बराच वेळ आवाज देऊनही सागरकडून प्रतिसाद मिळाला नाही. घाबरलेल्या आईने शेजारी राहणाऱ्या नातेवाईकांना ही बाब कळवली. त्यांचे शेजारी सुधीर जाधव आणि इतरांनी धाव घेतली तर त्यांना सागर गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून अाला. तातडीने त्याला खाली उतरून रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

Leave a Comment