सूद फाउंडेशनच्या मदतीचा कलेक्टर साहेबांनी फेटाळला दावा; मग सोनू सूदने पुरावा दाखवून दिले उत्तर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. परिणामी रुग्णांच्या संख्येसमोर वैद्यकिय व्यवस्था पुरती कोलमडताना दिसत आहे. अश्या संकटाच्या काळात बॉलिवूड अभिनेता आणि गरिबांचा दाता सोनू सूद लोकांसाठी देवदूत बनला. अगदी सर्वसामान्यांपासून ते दिग्गजांपर्यंत प्रत्येकाच्या मदतीला तो धावून जात आहे. सोनू सूदने सोमवारी ओडिशातील एका गरजू व्यक्तीस मदत केली होती. त्यानंतर सोनूने ट्विट करुन संबंधित व्यक्तीला मदत मिळाल्याचे सांगितले. मात्र सोनू सूदच्या ट्विटला रिट्विट करत ओडिशातील गंजाम जिल्ह्याचे कलेक्टर यांनी मिळालेल्या मदतीचा दावा फेटाळला होता. यानंतर सोनू सूदने संबंधित पुरावे ट्विट करीत त्यांना उत्तर केले.

ओडिशातील गंजाम जिल्ह्याचे कलेक्टर यांनी सोनू सूदच्या फाऊंडेशनकडून कुठलिही मदत मिळाली नसल्याचे ट्विटरवर सांगितले होते. संबंधित व्यक्ती महापालिकेच्या निगराणीखाली असून त्यांना घरीच आयसोलेट करण्यात आले आहे. आमचा सोनू सूद फाऊंडेशनशी कुठलाही संपर्क झालेला नाही, असेही कलेक्टर साहेबांनी अधिकृत ट्विटरवरुन म्हटले होते. गंजाम कलेक्टर यांच्या या ट्विटला सोनू सूदने थेट पुरावा दाखवत उत्तर दिले आहे. सोनूने संबंधित व्यक्तीच्या नातेवाईकांसोबत चॅटवर झालेल्या संवादाचे स्क्रीनशॉट काढून रीट्विट करताना शेअर केले आहेत. सोबत, सर आम्ही कधीच हा दावा केला नाही की, गरजवंत व्यक्तीने तुमच्याकडे मदत मागितली होती. आमच्याकडे गरजू व्यक्तीने मदत मागितली, त्यानंतर आम्ही त्यांच्यासाठी बेडची व्यवस्था केली आहे, असेही म्हटले आहे.

सोनू सूदच्या या ट्विटनंतर पुन्हा एकदा रिट्विट करीत कलेक्टर साहेबांनी सोनू सूद आणि सूद फाउंडेशनचे कौतुक केले आहे. ते म्हणाले कि, आमचा हेतू तुमच्या सिस्टमवर टीका करण्याचा नव्हता. २४ * ७ वेळ काम करणारी व रूग्णाला बेडची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी आमच्याकडे आमची स्वतःची टीम गंजाम आहे. तरीही बेडच्या उपलब्धतेबद्दल काही समस्या आहे की नाही हे तपासणे आमचे कर्तव्य आहे. म्हणूनच आम्ही वस्तुस्थिती स्पष्ट स्वरूपात मांडली. आपण आणि आपली संस्था चांगली कामगिरी करत आहात.

सोनू सूदने गतवर्षी लॉकडाऊन लागल्यानंतर गरजू लोकांना मदत करण्यास सुरुवात केली होती. सोनू सूद अजूनही लोकांना त्याच ओघाने मदत करताना दिसत आहे. आता कोरोनाला हरवण्यासाठी आणि लोकांचे प्राण वाचवण्यासाठी त्याने मोठा निर्णय घेतला आहे. देशात ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरचा सध्या मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवतो आहे. यामुळे सोनू सूदने देशात ऑक्सिजनची कमतरता भागविण्यासाठी इतर देशांकडून ऑक्सिजन प्लान्ट घेण्याचे ठरविले आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, सोनू सूदने फ्रान्स आणि इतर देशांमधून ऑक्सिजन प्लान्ट भारतात वेगवेगळ्या ठिकाणी बसवण्यासाठी मागिवले आहे.

Leave a Comment