सातारा जिल्हाधिकाऱ्यांचा नवा आदेश : अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकाने सुरू होणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा जिल्ह्यात आज शुक्रवारी दि.18 जून रात्री बारा वाजल्यापासून जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी नवा आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार अत्यावश्यक नसलेली दुकाने /आस्थापना यांना सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

गेल्या जवळपास महिनाभरापासून केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकाने नियम व अटी या नुसार सुरू होती. तर अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकाने बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला होता. मात्र शुक्रवारी 18 जून रोजी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी नवीन अध्यादेश जाहीर केला आहे. त्यामध्ये या सर्व दुकानांना परवानगी देण्यात आलेली आहे.

अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी चार वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी आहे. तर या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांना पाच वाजेपर्यंत घरी पोहोचण्यासाठी प्रवास करण्यास मुभा देण्यात आलेली आहे. अत्यावश्यक नसलेली दुकाने/ आस्थापना सोमवार ते शुक्रवार या दिवशीच सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली, असून शनिवार-रविवार बंद असणार आहेत.

हॉटेल, रेस्टॉरंट सुरू राहणार

जिल्ह्यातील हॉटेल, रेस्टॉरंट हे सकाळी 7 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी असणार आहे. हॉटेल, रेस्टॉरंट मध्ये क्षमतेच्या 50% क्षमतेने सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. तर रात्री 8 वाजेपर्यंत घरपोच पार्सल सेवा देण्यास परवानगी देण्यात आलेली आहे.

Leave a Comment