व्हावे लहानहुनी लहान…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

गाव गोष्टी | आकाश भुजबळ 

लहानपण देगा देवा |मुंगी साखरेचा रवा ||

तुका म्हणे बर्वे जन |व्हावे लहानहुनी लहान ||

या संत तुकाराम महाराज यांच्या  ओळी आठवल्या की बालपणात पुन्हा हरवून जावंसं वाटत… कारण लहानपणी चिंच आणि बोरांसाठी अनवाणी पायाने शेतच्या शेतं ओलांडून मित्रांसोबत फिरण्याची मजा काही औरच होती. बोरं, चिंच, कैऱ्या तोडण्यासाठी किव्हा वेचण्यासाठी जायला घरचे नेहमीच मनाई करायचे, कारण शेतीत सुरू असलेल्या कामांपासून बोराचे, आंब्याचे  झाड दूर होते.  घरच्या मंडळींची आमच्यावर दक्ष पोलीस विभागासारखी एकदम करडी नजर असायची.

मात्र आम्ही त्यांना मनवून जातच असू… एक एक बोर,कैरी  वेचून जमा करणे.. दगड मारून कैऱ्यांचा संच  पाडणे.. हातात येईल इतक्या उंचीवरही काही फांद्या वाढलेल्या होत्या…त्या जोरजोरात हलवून बोर/ चिंच पाडणे … बोरं वेचताना झाडाची काटी हाता/पायात  घुसून वेदनाही व्हायच्या… कधी तर बोरीच्या झाडावर विळखा टाकलेले सर्पही आम्ही बघितलेत.. अशी बोरं, चिंच व आंबे  खाण्याची आणि गोळा करण्याची मजा आम्ही बालपणात आमच्या गावी अनुभवली आहे.

‘लहाणपण देगा देवा’ या प्रमाणे बालपणातील आनंद हा जणू समुद्रातील शिंपले गोळा करून मोती सापडण्याइतका वेगळाच असतो, नाही का..??

आमच्या शेताच्या बांधावर असलेलं बोरीचं झाडाची चव अतिशय गोड आणि चविष्ट असल्याने फार कमी बोरं चांगली मिळायची, नाहीतर अर्धी पेक्षा जास्त बोरं किडलेलीच  असायची. मग आमच्या बांदावरच्या बोरीकडून आमचा मोर्चा वळायचा भाऊबंधाच्या शेतीकडे…. कांदे,तूर,कापसाची शेती तुडवत-वाचवत आम्ही भावंडं दुसऱ्या बोरीच्या झाडांची बोरं गोळा करायचो आणि ती खायचा विलक्षण आंनद आम्ही घ्यायचो. तो आनंद सुद्धा समुद्रातील शिंपले गोळा करून मोती सापडण्याइतका वेगळाच असायचा…

akash bhujabal

आकाश भुजबळ.

ई-मेल – [email protected]

Leave a Comment