Sunday, January 29, 2023

दिलासादायक ः दिवाळखोरीत निघालेल्या कराड जनता बॅंकेच्या ठेवीदारांना पैसे मिळणार परत

- Advertisement -

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

सहकार क्षेत्रातील मोठी असणाऱ्या कराड जनता सहकारी बॅंकेचा बॅंकींग परवाना रिझर्व्ह बॅंकेने 7 डिसेंबर 2020 रोजी परवाना रद्द केला होता. या आदेशामुळे ठेवीदार, सभासदामध्ये मोठी खळबळ उडाली होती. मात्र आता ज्या ठेवीदारांनी क्लेम फाॅर्म जमा केला होता, त्याच्यासाठी दिलासादायक बातमी आली आहे. क्लेमसाठी 40 हजार 415 ठेवीदारांनी फाॅर्म जमा केले होते. त्यापैकी 39 हजार 32 लोकांना 376 कोटी 29 लाख रूपये मिळणार असल्याचे उपनिबंधक तथा बॅंकेचे अवसायक मनोहर माळी यांनी सांगितले.

- Advertisement -

कराड जनता बँकेचा परवाना रिझर्व्ह बँकेकडून रद्द करण्यात आल्यामुळे सातारा जिल्हयातील ठेवीदार हतबल आहेत. कराड जनता बँकेचे एकूण 1 लाख 33 हजार 421 ठेवीदार आहेत. यापैकी पाच लाखापर्यंतच्या ठेवींना विम्याचे संरक्षण होते. त्यामुळे 5 लाख पर्यंतच्या ठेवी परत देण्यासाठी विम्याचे प्रस्ताव तयार करून बँकेकडून पाठवण्यात आले होते. पश्चिम महाराष्ट्रात जनता बँकेच्या 29 शाखा आणि 2 विस्तारीत कक्ष असून पुणे, मुंबई, सांगली, सातारा, कोल्हापूर इथं या शाखा कार्यरत आहेत. त्याही बंद करण्यात केल्याने ठेवीदार हतबल झाले होते. मात्र विम्याचे संरक्षण असणाऱ्या पाच लाखांच्या आतील ठेवी येत्या 15 दिवसांत मिळणार असल्याने ठेवीदारांना दिलासा मिळाला आहे.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group