Saturday, March 25, 2023

दिलासादायक…! घाटी रुग्णालयात 12 व्हेंटिलेटरची वाढ

- Advertisement -

औरंगाबाद : जिल्हयासह शहरात कोरोनाचा कहर सुरूच आहे.  त्यामुळे ठिकठिकाणांहून दाखल होत असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमुळे घाटी रुग्णालयात व्याप जास्त असल्याने आरोग्य सुविधेत वाढ करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहे. पाहायला मिळत आहे.

सध्याच्या कोरोनाच्या काळात व्हेंटिलेटरच महत्व हेरून जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्था पुणे यांच्यात CSR फंड मधून 25 व्हेंटिलेटर घाटीला देण्याचा सामांज्यस करार झाला होता.  यापैकी 13 व्हेंटिलेटर त्यांनी दिले होते आज उर्वरित 12 व्हेंटिलेटरचा लोकार्पण सोहळा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते झाला.

- Advertisement -

यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थाचे आभार मानले. यावेळी घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळलीकर, डॉ. ज्योती बजाज,  बजाज ट्रस्टचे सी. पी. त्रिपाठी, राम भोगले, कमलेश धूत, CMIA प्रेसिडेंट प्रसाद कोकील, सीमेन्सचे सुमित सचदेव,  रमण आजगावकर,  शिवप्रसाद जाजू,  सतीश लोणीकर आदी मान्यवर उपस्थित होते.