औरंगाबाद : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या देवसेंदिवस कमी होत आहे ही दिलासादायक बाब आहे. गेल्या तीन दिवसापासून आकडा विसच्या आत आला आहे. गेल्या 24 तासात म्हणजेच रविवारी (दि.13) अवघे 14 रुग्ण आढळले. ग्रामीण भागात मात्र थोडी वाढ झाली असून, दिवसभरात 99 रुग्ण आढळले.
जिल्ह्यात रविवारी एकूण 113कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1,44,694 झाली आहे. दिवसभरात 229 जणांना मृत्यू झाल्याने एकूण 3342 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 1739 रुग्णावर उपचार सुरु आहेत
24 तासात 11 मृत्यू
जिल्ह्यात रविवारी 11 रुग्णांचा मृत्यू झाला. घाटी रुग्णालयात सिल्लोड – चंदापूर येथील 40 वर्षीय महिला, औरंगाबाद करमाड येथील 70 वर्षीय महिला, दौलताबाद मधील 57 वर्षीय पुरुष चिकलठाणा येथील 75 वर्षीय पुरुष, सिडकोतील 51 वर्षीय महिला, पैठण बिडकीनमधील 60 वर्षीय पुरुष, सिल्लोड – धानोरा येथील 36 वर्षीय महिला, सोयगाव सिंदोळ येथील 35 वर्षीय पुरुष, हडकोतील 67 वर्षीय पुरुष, हडकोतील 67वर्षीय पुरुष, बन्सीलाल नगरातील 69 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.