बारामती : शरद पवार, उर्मिलाविषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या विरोधात तक्रार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

बारामती प्रतिनिधी | लोकसभेच्या उत्तर मुंबई मतदार संघातील काँग्रेस उमेदवार सिने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष  शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह  पोस्ट फेसबुकवर टाकल्याबद्दल बारामती शहर पोलीस स्टेशनला धनंजय कुडतरकर या व्यक्ती विरुद्ध तक्रार नोंदविण्यात आली आहे.

बारामती येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ही तक्रार पोलिस ठाण्यात नोंदविली आहे. या तक्रारीनंतर संबंधित पोस्ट या फेसबुकवरून डिलीट झाली असली तरी संबंधित व्यक्तीचे फेसबुक अकाउंट मात्र अद्यापही सुरू असल्याचे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.

या संदर्भात बारामतीचे पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी संबंधित व्यक्तीविरुद्ध कारवाई करणार असल्याची ग्वाही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दिली आहे .या प्रकरणी बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मिडीयाचे अध्यक्ष सुनिल बनसोडे, उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मिडीया बारामती तालुका पैगंबर शेख,उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मिडीया संदीप मालुसरे, सुरज सावंत, वैभव पवार, दत्ता तांबे, सूर्यकांत पिसाळ, दीपक टेकाळे यांनी बारामती शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

सर्वात वेगवान आणि मोफत  बातम्या मिळवण्यासाठी आजच आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा. तसेच आमच्या फेसबुक पेजला लाईक करा 

whatsapp  ग्रुपची लिंक – http://bit.ly/2H9mIl1

फेसबुक पेजची लिंक http://bit.ly/2YmZejl

महत्वाच्या बातम्या 

शिवसेनेचे सर्वच खासदार करोडपती तर सर्वाधिक संपत्ती असणारे पहिले ३ खासदार काँग्रेसचे

रामराजे बिन लग्नाची औलाद ; रणजितसिंहांची जहरी टीका

विखे-थोरात वादात नवी ठिणगी ; संगमनेरमध्ये फाडले सुजय विखेंचे बॅनर

लठ्ठपणावरून होत असलेल्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

परशाची आर्ची १२ वीला झाली पास ; मिळाले एवढे टक्के गुण

विधान परिषद पोटनिवडणूक : या नेत्याला भाजपने दिली उमेदवारी

विधानसभा निवडणुकीत पुन्हा महायुतीची सत्ता येणार ; कॉंग्रेस आघाडीला मिळणार एवढ्या जागा

Leave a Comment