ATM आणि बँकिंग सर्व्हिसमध्ये अडचण येत असेल तर येथे करा तक्रार, आता लगेचच केली जाणार कारवाई

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज Retail Direct Scheme आणि Integrated Ombudsman Scheme लाँच केली आहे. RBI च्या Retail Direct Scheme मुळे सरकारी सिक्युरिटीजमध्ये रिटेल पार्टिसिपेशन वाढेल तर Integrated Ombudsman Scheme चा उद्देश तक्रार निवारण सिस्टीममध्ये आणखी सुधारणा करणे आहे.

मोदी म्हणाले, “आज सुरू झालेल्या दोन योजनांमुळे देशातील गुंतवणुकीची व्याप्ती वाढेल आणि गुंतवणूकदारांसाठी कॅपिटल मार्केटमध्ये प्रवेश सुलभ, जास्त सोयीस्कर होईल.” भारतातील सर्व सरकारी सिक्युरिटीजना सुरक्षेची गॅरेंटी असते, त्यामुळे लहान गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीच्या सुरक्षिततेची खात्री दिली जाईल.

बँकिंग ग्राहकांना दिलासा
Integrated Ombudsman Scheme अंतर्गत बँकिंग ग्राहकांच्या तक्रारी सोडवता येतात. RBI द्वारे रेग्युलेट केलेल्या संस्थांविरुद्ध ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी एक उत्तम सिस्टीम देणे हा यामागचा उद्देश आहे. ही योजना One Nation One Ombudsman वर आधारित आहे. यामध्ये ग्राहकांना तक्रारी करण्यासाठी एक पोर्टल, एक ईमेल आणि एक ऍड्रेस अशी सुविधा देण्यात आली आहे. ग्राहकांना त्यांच्या तक्रारी नोंदवण्यासाठी, कागदपत्रे सादर करण्यासाठी आणि फीडबॅक देण्यासाठी जागा मिळेल. तक्रारी सोडवण्यासाठी आणि तक्रारी नोंदवण्यासाठी अनेक भाषांमध्ये एक टोल फ्री नंबर देखील असेल.

गिल्ट खाते बचत खात्याशी जोडले जाईल
मोदी म्हणाले, “सरकारी सिक्योरिटीजमध्ये गुंतवणूक करण्यासाठी फंड मॅनेजर्सची गरज भासणार नाही. गुंतवणूकदार डायरेक्ट गिल्ट खाते उघडू शकतात. हे खाते बचत खात्याशीही जोडले जाईल.’ ते म्हणाले, ‘लोकांसाठी हे किती सोपे असेल याची तुम्ही कल्पना करू शकता.’

You might also like