दंगल गर्ल’ बबिता फोगाट विरोधात औरंगाबाद पोलिसांत तक्रार दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद प्रतिनिधी | दंगल गर्ल’ बबिता फोगाटने देशातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येला तबलिगी जमातीला जबाबदार धरत एक वादग्रस्त ट्विट केलंे आहे. बबिताच्या या पोस्टवरून तिच्यावर अनेक स्तरांतून जोरदार टीका होत आहे. अनेकांनी समाजात तेढ निर्माण करणाऱ्या बबिताचं ट्विटर अकाऊंट बंद करण्याची मागणी केली आहे. अशात आता बबिताच्या विरोधात महाराष्ट्रातील औरंगाबाद येथील सिटी पोलिस चौकीत तक्रार दाखल झाली आहे.

https://twitter.com/Nupur_Nupur_/status/1251058829850099712

बबिताच्या सदर ट्विटमुळे मुस्लिम समाजाबद्दल इतर लोकांमध्ये द्वेशाची भावना निर्माण झाली. तसेच अनेक ठिकाणी मुस्लिमांना आडनाव विचारुन मारहान करण्यात आली. काही सोसायट्यांमध्ये मुस्लिम फळ, भाजी विक्रेत्यांना प्रवेश नाकारण्यात आला. तेव्हा आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करुन तिच्या विरुद्ध कडक कारवाई करावी अशी मागणी तक्रारदाराने केली आहे. अॅड खिजर पटेल नामक व्यक्तीने सदर तक्रार दिली आहे. यानंतर हॅलो महाराष्ट्रने औरंगाबाद सिटी पोलिसांशी संपर्क साधला असता औरंगाबादेतील सिटीचौक पोलिस ठण्यात तक्रार देण्यात आली होती. ती तक्रार हरियाणा पोलिसांना औरंगाबाद पोलिसांनी वर्ग केली आहे अशी माहिती सिटीचौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांनी दिली आहे.

दरम्यान, २०१९ च्या हरयाणा राज्याच्या निवडणूकीत भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढवणाऱ्या बबिताच्या समर्थनात काहींनी ट्विट केलं आहे. ऑलिम्पिक पदकविजेता कुस्तीपटू योगेश्वर दत्तनेही बबिताचे समर्थन केले. बबिता ही आंतरराष्ट्रीय व्रेस्टलर आहे. तिच्यावर दंगल नावाचा चित्रपटही निघाला आहे.२०१४ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत तिने सुवर्णपदक जिंकले आहे. त्याशिवाय २०१० आणि २०१८ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत तिच्या नावावर रौप्यपदकं आहेत. २०१२ च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत तिनं कांस्य, तर २०१३ च्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक पटकावले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”

इतर महत्वाच्या बातम्या –

राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ३२०२ वर, दिवसभरात २८६ नवे रुग्ण

२० एप्रिलनंतर टाळेबंदीत शिथिलता? पहा काय म्हणतायत राजेश टोपे

सरकार हॅलिकोप्टरमधून टाकणार लोकांसाठी पैसे? जाणुन घ्या सत्य

राज ठाकरेंनी केली मुख्यमंत्र्यांना ‘ही’ महत्त्वाची सूचना; म्हणाले..

खरंच..! कोरोना चीनच्या प्रयोगशाळेत तयार झाला होता?अमेरिकन गुप्तचर यंत्रणांनी सुरू केला तपास

ब्रेकिंग बातम्यांसाठी पहा -www.hellomaharashtra.in

Leave a Comment