Saturday, January 28, 2023

चिंता वाढली : सातारा जिल्ह्यात नवे 974 कोरोना बाधित, पाॅझिटीव्ह रेट 10. 35 टक्के

- Advertisement -

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके 

सातारा जिल्ह्यात शुक्रवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये 974 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 627 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली. जिल्ह्यात झालेल्या चाचण्या आणि त्यामध्ये आलेल्या बाधितांचा पाॅझिटीव्हीटी रेट 10. 35 इतका आहे.

- Advertisement -

जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 10 हजार 813 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या 1 लाख 96 हजार 68 इतकी झाली आहे. तर जिल्ह्यात एकूण 1 लाख 82 हजार 150 बरे झालेली रुग्णसंख्या आहे. तर कालपर्यंत 4 हजार 4434 बाधितांचा मृत्यू झाला आहे. गुरूवारी दिवसभरात 25 कोरोना बाधितांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. गेल्या चोवीस तासात 9 हजार 407 जणांचे नमुने घेण्यात आले.

कोरोना बाधितांचा पाॅझिटीव्हीटी रेट 10 टक्केहून अधिक झालेला आहे. उपचार्थ रूग्ण गेल्या आठवडाभरात आठ हजारांजवळ होती, ती पुन्हा 10 हजारांच्या वरती गेलेली आहे. आठ दिवसापूर्वी बाधित व बरे होण्याचे प्रमाण समसमान होते, मात्र गेल्या दोन दिवसांत बरे होणाऱ्यांपेक्षा बाधितांचा आकडा वाढत असल्याने जिल्ह्यात चिंतेचे वातावरण पहायला मिळत आहे. शनिवारपासून निर्बंध कडक करण्यात आल्याने जिह्यातील नागरिकांच्यातून तीव्र भावना व्यक्त केल्या जावू लागल्या आहेत.