हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नांदेड जिल्ह्यातील देगलूर- बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून जितेश अंतापूरकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसचे दिवंगत आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचं कोरोनामुळे निधन झालं होतं. त्यामुळे या जागेसाठी काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केली होती. त्यामुळे या रिक्त जागेवर काँग्रेस कोणाला उमेदवारी देणार याबाबत चर्चा होत्या. अखेर त्यांचे सुपुत्र जितेश अंतापूरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
Congress President Smt. Sonia Gandhi has approved the candidature of the following persons for bye-elections from the states listed below. pic.twitter.com/HnIVCOMAuu
— INC Sandesh (@INCSandesh) October 4, 2021
तर दुसरीकडे भाजपने शिवसेनेचे माजी आमदार असलेले सुभाष साबणे यांना फोडून थेट उमेदवारी दिली आहे. आपण अशोक चव्हाण यांच्या एकाधिकार शाहीला कंटाळून शिवसेना सोडतोय अस त्यांनी पक्ष सोडताना म्हंटल होत. तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणीत त्यांना अश्रूही अनावर झाले होते.
जिंकणार तर आम्हीच- दोन्ही पक्षांचा दावा
गेल्यावेळी बिलोली देगलूर मतदारसंघात स्वर्गीय अंतापूरकर यांनी 89 हजार 407 मते घेत आपले प्रतिस्पर्धी सुभाष साबणे यांचा जवळपास वीस हजार मताच्या फरकाने पराभव केला होता. त्यावेळी साबणे यांना 66974 मते मिळाली होती. रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनांनंतर ही जागा काँग्रेसकडेच राहिल. मोठ्या फरकाने जितेश अंतापूरकर निवडून येतील, असा विश्वास महाविकास आघाडीचे नेते व्यक्त करत आहेत.