नवी दिल्ली प्रतिनिधी | २०१९ च्या आगामी लोकसभा निवडणूकसाठी काँग्रेसने आपली १५ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत उत्तर प्रदेशच्या ११ आणि गुजरातच्या चार जागांचा समावेश आहे. सोनिया गांधी यांनी सर्व चर्चा फेटाळून लावत लोकसभा उमेदवारी जाहीर केली.
सोनिया गांधी या रायबरेली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. याआधी सोनिया गांधी निवडणूक लढणार नाहीत अशी चर्चा सुरु होती, मात्र सोनिया गांधी निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे त्यांच्या अमेठी मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.
काँग्रेसने जारी केलेल्या यादीत बड्या नेत्यांची नावं आहेत. जे नेते आपल्या पारंपारिक मतदारसंघातून निवडणूक लढवतात त्यांचीच नावं पहिल्या यादीत आहेत. मात्र प्रियांका गांधी यांचे नाव या यादीमध्ये नसल्याचे दिसते आहे. सोनिया गांधींऐवजी प्रियांका गांधी काँग्रेसकडून लोकसभेच्या रिंगणात उतरतील अशी शक्यता होती. ज्या जागांवरून वाद नाही अशा जागांवरील उमेदवारांची नवे जाहीर करण्यात आली आहेत.
इतर महत्वाचे –
अयोध्या विवादाप्रकरणी त्रिसदस्यीय समितीत ‘हे’ तीन मध्यस्थ
साताऱ्याच्या विकासकामात राजकारण करणाऱ्याला सोडणार नाही – उदयनराजे भोसले
प्रेयसीचे लाड पुरविण्यासाठी आई ने पैशे न दिल्याने युवकाने जीवन संपविले