लसीकरण सर्टिफिकेटवर पंतप्रधान मोदींचा फोटो नकोच; काँग्रेसचा आक्षेप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोना लसीकरण प्रमाणपत्रावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटोला काँग्रेसने विरोध केला आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी याबाबत विरोध दर्शविला असून केरळ आणि छत्तीसगडमध्ये व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेटवर मोदींचा फोटो नाही. त्यामुळे महाराष्ट्रातही त्यांचा फोटो नसावा. आमचा या फोटोला आक्षेप आहे, असं भाई जगताप म्हणाले.

यावेळी त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला. भाजपशासित राज्यात काय परिस्थिती आहे. ते आधी चंद्रकांतदादांनी पाहावं. उत्तर प्रदेशात तर मृतदेहांची विटंबना होत आहे. भाजपचे लोक मयताच्या टाळूवरचं लोणी खाणारे आहेत, अशी टीकाही त्यांनी केली तसेच कोविडसाठी चंद्रकांतदादांनी किती पैसे दिले? असा सवालही त्यांनी केला.

मुंबई महापालिकेत आम्ही स्वबळावर लढणार आहोत अशी घोषणा त्यांनी पुन्हा एकदा केली. आम्ही सर्वच्या सर्व 227 जागांवर लढवणार असून यापूर्वीही आम्ही वेगळेच लढलो होतो, असं भाई जगताप यांनी म्हंटल. तसेच भाजपने आपल्या जागा टिकवून दाखवाव्यात असंआव्हान त्यांनी दिले.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

You might also like