Wednesday, March 29, 2023

पाकिस्तान, नेपाळ मध्ये पेट्रोल 58-60 रुपये असताना भारतात 106 रुपये कसं काय?? काँग्रेसचा सवाल

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात इंधन दरवाढीचा भडका उडालेला आहे. गॅस चे दर गगनाला भिडले असतानाच पेट्रोल- डिझेल दरवाढीने सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी मोदी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. पेट्रोल- डिझेल, घरगुती गॅस दरवाढ आणि वाढत्या महागाईविरोधात मुंबई काँग्रेसने पुकारलेल्या आंदोलनावेळी ते बोलत होते.

शेजारच्या पाकिस्तान, बांगलादेशात पेट्रोल प्रति लिटर ५८ रुपये तर नेपाळमध्ये ५६ रुपये लिटर आहे. मग भारतात पेट्रोल १०६ रुपये लिटर का, असा सवाल काँग्रेसने केला आहे. पेट्रोल-डिझेल आणि घरगुती गॅसचे दर वाढवून देशातील सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक शोषण बंद करा, अशी टीका आ. भाई जगताप यांनी केली.

- Advertisement -

काँग्रेस सरकारच्या काळात पेट्रोल ६८ रुपये लिटर असताना उद्विग्न होऊन ट्विटरवर स्वतःची गाडी जाळण्याची भाषा करणारे अमिताभ बच्चन आणि जनतेला स्वतःची गाडी विकून सायकल वापरण्याचा सल्ला देणारे अक्षय कुमार आणि अनुपम खेर यांसारख्या बॉलिवूड कलाकारांना सध्याची इंधन दरवाढ दिसत नाही का, असा सवाल करत आज पेट्रोल १०६ रुपये प्रतिलिटर इतके भरमसाट वाढलेले असताना हे कलाकार मूग गिळून गप्प का बसले आहेत? की वाढलेले पेट्रोल व डिझेलचे दर यांना दिसत नाहीत, याचे उत्तर बाॅलिवूड कलाकारांनी द्यायला हवे असेही भाई जगताप यांनी म्हंटल.