निवडणुकीत पडले फक्त एकच मत; पराभवानंतर छोटू भोयर यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नागपूर विधान परिषद निवडणुकीच्या निकालाकडे गेल्या काही दिवसापासून अवघ्या राज्याचे लक्ष लागले होते. आज या निवडणुकीचा निकाल लागला. या निवडणुकीत भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी दणदणीत विजय मिळवला. तर भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या छोटू भोयर यांना केवळ एकच मत पडले. या निकालावर भोयर यांनी प्रतिक्रिया दिली असून आज बावनकुळेंनी चाळीस कोटी रुपये खर्च करून निवडणुकीत विजय मिळवला आहे. हा तर लोकशाहीचा अपमान आहे, असा आरोप भोयर यांनी केला आहे.

नागपूर विधान परिषद निवडणुकीत पराभव झाल्यानंतर छोटू भोयर यांनी माध्यमांशी संवाद साधत पहिली प्रतिक्रिया दिली. यावेळी ते म्हणाले, पस्तीस वर्ष ज्या ठिकाणी आम्ही नाराज होतो. त्या ठिकाणी पंधरा दिवसांच्या त्यांच्या पक्षांमध्ये जाऊन माझा पराभव झाला. त्याबद्दल माझ्या मनात नाराज होण्याचे काही कारणच नाही. मी उमेदवारीसाठी काँग्रेमध्ये आलेलो नव्हतो.

भाजपने हि निवडणूक लोकशाहीचा अपमान करून जिकंलेली आहे. चन्द्रशेखर बावनकुळे यांनी पैसे उधळून हि निवडणूक जिकली आहे. अशा प्रकारचे काम करणे हे लोकशाहीसाठी अपमानकारक आहे, अशी टीका भोयर यांनी केली आहे.

Leave a Comment