जीन्सवाल्या मुलींना मोदी आवडत नाहीत, 40-50 वयाच्या महिलांनाच… ; काँग्रेस नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नेहमी आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत राहणारे काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी आता तर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवरच वादग्रस्त विधान करत नव्या वादाला तोंड फोडलं आहे. जीन्सवाल्या मुलींना मोदी आवडत नाहीत, 40-50 वयाच्या महिलांवरच मोदींचा प्रभाव आहे असं वक्तव्य दिग्विजय सिंह यांनी केलं आहे.

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये एका कार्यक्रमाला संबोधित करताना दिग्विजय सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल धक्कादायक टीका केली. ते म्हणाले की, केवळ 40-50 वयोगटातील महिलांवरच पंतप्रधान मोदींचा प्रभाव आहे, तर जीन्स घालणाऱ्या आणि मोबाईल वापरणाऱ्या महिलांवर मोदींचा प्रभाव नाही. आणि याच महिला सोशल मीडियावर असून आपण त्यांच्याशी संपर्क साधावा आणि महिला काँग्रेस मध्ये युवा वर्गाला जास्तीत जास्त सामावून घ्यावे असा सल्ला त्यांनी प्रियांका गांधी यांना दिला.

दरम्यान, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत जर भारतीय जनता पक्षाचा विजय झाला तर तर देशातील संविधान संपवतील कारण ते चीन आणि रशियाचा मार्गावर चालत आहेत असा आरोपही दिग्विजय सिंह यांनी भाजपवर केला

Leave a Comment