उत्तर प्रदेश निवडणुकीत 40 टक्के महिलांना उमेदवारी देणार; प्रियांका गांधींची मोठी घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या देशात राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. अनेक राज्यांच्या आगामी निवडणूकींमुळे विविध पक्षांकडून पक्ष बळकटीकरणासाठी मोर्चेबांधणी केले जाऊ लागली आहे. उत्तर प्रदेश निवडणुकीत 40 टक्के महिलांना काँग्रेस तिकीट देणार असल्याची मोठी घोषणा आज काँ ग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधीं यांनी दिली. तसेच ‘लडकी हूँ, लड सकती हूँ!’ असा नाराही दिला आहे.

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी उत्तरप्रदेशात आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठी घोषणा केली आहे. ‘लडकी हूँ लड सकती हूँ’चा नारा देत प्रियंका गांधी यांनी आगामी निवडणुकीत काँग्रेस पक्ष महिलांना 40 टक्के तिकिट देणार असल्याचे त्यांनाही सांगितले आहे.

यावेळी प्रियंका गांधी म्हणाल्या की, महिलांनी राजकारणात आले पाहिजे. महिलांना समाजाचे प्रतिनिधित्व करता यावे, राजकारणात येता यावे म्हणून आम्ही आगामी निवडणुकीत 40 टक्के महिला उमेदवारांना तिकिट देण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने आम्ही महिलांना उमेदवारी देण्यासाठी आम्ही प्रत्येक विधानसभा निवडणुकीत अर्ज मागवणार आहोत. उत्तर प्रदेशात सत्तेचा दुरुपयोग याच्याआधी एवढा कधीच झाला नव्हता.

Leave a Comment