भाजपने दुसऱ्याच्या घरात चोरी करुन विजय मिळवला ; अशोक चव्हाणांची भाजपवर सडकून टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नंदुरबार-धुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवाराचा पराभव होऊन भाजपच्या अमरिश पटेल यांनी दणदणीत विजय मिळवला. काँग्रेसचा हा पराभव अशोक चव्हाण यांच्या जिव्हारी लागला आहे. पटेल यांच्या विजयानंतर अशोक चव्हाण यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. भाजपने दुसऱ्याच्या घरात चोरी करुन विजय मिळवला आहे, असा घणाघात अशोक चव्हाण यांनी केला. यावेळी त्यांनी काँग्रेसला रामराम करुन भाजपमध्ये सहभागी झालेल्या अमरीश पटेल यांच्यामुळे झालेल्या फुटीवरही भाष्य केलं

अशोक चव्हाण म्हणाले, “भाजपने मिळवलेला विजय हा दुसर्‍याच्या घरात चोरी करून मिळवलेला विजय आहे. दुसऱ्याच्या घरातील चोऱ्या करायच्या आणि त्याला आपली संपत्ती म्हणायचं असाच प्रकार भाजप करत आहे. भाजपने ही चोरी केली आहे. आम्हाला 5 जागांपैकी अनेक जागा मिळतील. तसेच आमचं आघाडीचं सरकार देखील पाच वर्षे हे सरकार टिकेल.”

नंदुरबार-धुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद उफाळून आला आणि त्याचा थेट फटका काँग्रेस बसला. भाजपच्या अमरिश पटेल यांना 332 तर विरोधी उमेदवार अभिजीत पाटील यांना 98 मतं मिळाली. त्यामुळे अमरिश पटेल यांनी 234 मतांनी बाजी मारली. अमरिश पटेल यांचा या मतदारसंघातील हा सलग तिसरा विजय आहे. यापूर्वी त्यांनी 2009, 2015 आणि आता 2020 मध्ये विजय मिळवला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like