चंद्रकांतदादांनी मागच्या काळात निर्माण केलेले खड्डेच अजून बुजवतोय; अशोक चव्हाणांचा टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी । ‘चंद्रकांतदादांनी मागच्या काळात निर्माण केलेले खड्डेच बुजवतोय,’ असा टोला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे. अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्यासाठी अशोक चव्हाण परभणीत आले होते. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत  चव्हाण यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडलं.

मी चंद्रकांत पाटलांसारखी तारीख पे तारीख देणार नाही. आल्यापासून त्यांनी निर्माण केलेले खड्डे बुजवतोय. दुसरं कामच उरलेलं नाही. हे खड्डे दिसावेत आणि ते तात्काळ बुजवून घेता यावेत म्हणून विमानाऐवजी गाडीनेच फिरत असल्याचं चव्हाण यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी काँग्रेसकडे असलेल्या पालिकांना निधी मिळत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. (ashok chavan taunt chandrakant patil over potholes in maharashtra)

“काँग्रेसची सत्ता असलेल्या महापालिकांना मुख्यमंत्र्यांकडून निधी मिळत नाही. त्यामुळे नांदेडलाही निधी मिळाला नाही. मात्र आपण सार्वजनिक बांधकाम खात्याकडून निधी मिळवून दिला,” असे वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केले. सत्तेत असताना आपल्या भागाचा विकास झाला पाहिजे, या मताचा मी आहे. पण दुर्दैवाने कोरोनामुळे 30 टक्केच निधी मिळाला, पण मराठवाड्याला अधिकचा निधी देण्याची माझी भूमिका असल्याची ग्वाही यावेळी अशोक चव्हाण यांनी दिली.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in

Leave a Comment