संजय राऊतांनी टोला देताच नाना पटोलेंनी दिले ‘हे’ प्रत्युत्तर; म्हणाले…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : काँग्रेसच्या स्वबळाच्या नाऱ्यावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज सामनाच्या अग्रलेखातून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर निशाणा साधला आहे. तत्यामध्ये पटोलेंच्या मनातील मन की बातचा उल्लेख करीत त्यांच्या भाजपनंतरच्या काँग्रेसमधील कामाचा उल्लेख केला आहे. शिवसेनेने लगावलेल्या टोल्याला नाना पटोले यांनीही प्रतिउत्तर दिले आहे.

सामनाच्या अग्रलेखातून राऊतांनी केलेल्या लिखाणाबद्दल पटोले यांनी म्हंटल आहे की, संजय राऊत यांनी जो अग्रलेख लिहिला आहे. त्या अग्रलेखातून त्यांनी माझ्या मनातील भावना मांडलेल्या आहेत. राऊत यांनी ,माझ्या मनातील बरोबर ओळखले आहे. आणि तेच प्रत्यक्षात अग्रलेखातून मांडले आहे. राऊत यांनी स्वबळावरून जे म्हंटले आहे. त्याला माझे असे मत आहे कि, स्वबळाबाबत पक्षनेतृत्व निर्णय घेईल. २०२४ मध्ये नंबर वन पक्ष होईल. विरोधी पक्ष असलेल्या भाजपने सध्या सर्वत्र देशासह राज्यत अस्थिरतेचे वातावरण निर्माण केले आहे. या विरोधात काँग्रेस लढाईही लढत आहे. अशा परिस्थितीत विरोधक मात्र सातत्याने सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पटोलेंबद्दल अग्रलेखात हंटले आहे कि, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या बोलण्यावर राज्यातील आघाडी सरकारच भवितव्य अवलंबून आहे असे जर वाटत असेल तर ते चुकीचे आहे. नानांच्या बोलण्यावर आघाडी सरकारचे भवितव्य अवलंबून नाही. मोकळ्या स्वभावाचे नाना पटोले आहेत. ते अधून मधून त्यांची मन की बात व्यक्त करतात. नाना अगोदर भाजपमध्ये होते.

Leave a Comment