शरद पवार युपीएचे अध्यक्ष होणार का ?? पी चिदंबरम यांनी केलं ‘हे’ मोठं विधान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे संयुक्त पुरोगामी आघाडीचं (यूपीए) अध्यक्षपद सोपवण्यासंबंधी पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देशात विरोधी पक्ष खिळखिळा असून युपीए मजबूत करण्याची गरज आहे. यासाठी शरद पवार यांच्याकडे नेतृत्व सोपवावं अशी भूमिका मांडली आहे. दरम्यान काँग्रेसचे जेष्ठ नेते पी चिदम्बरम यांनी प्रथमच यावर भाष्य केले आहे.

संयुक्त पुरोगामी आघाडीमध्ये अध्यक्ष नावाची कोणतीही संकल्पना नाही. अनेक दल जेव्हा एकत्र येतात, तेव्हा आघाडीचा विस्तार आणि त्यांच्यात बैठका घडवून आणण्यासाठी एका नेत्याची गरज असते. आघाडीमध्ये जो पक्ष सर्वांत मोठा आहे, त्याच पक्षाचा नेता हा यूपीएचा अध्यक्ष असतो, असे चिदंबरम म्हणाले. तसेच, यूपीएच्या अध्यक्षांची निवड ही पंतप्रधानपदाची निवड नाही. सर्वांत मोठ्या पक्षाचा नेता हाच यूपीएच्या बैठाकांचा अध्यक्ष असतो. शरद पवार यांनासुद्धा यूपीएच्या अध्यक्षपदात रस नसावा, असे चिदंबरम म्हणाले.

पी चिदंबरम यांनी यावेळी युपीएमधील पक्षांच्या बैठकीचं महत्व सांगितलं. जर मित्रपक्षांची बैठक बोलावली तर काँग्रेस अध्यक्ष त्याचं नेतृत्व करणार हे नैसर्गिक आहे असं ते म्हणाले आहेत. “युपीएची बैठक घेण्यासाठी काही पक्ष पुढाकार घेऊ शकतात आणि काँग्रेस त्यात सहभागी होईल. पण जर काँग्रेसने बैठक बोलावली असेल तर काँग्रेसचाच नेता बैठकीचं नेतृत्व करेल,” असं पी चिदंबरम यांनी सांगितलं आहे.

यापूर्वी शरद पवारांनी हे वृत्त फेटाळले

शरद पवार यांनी याआधीदेखील युपीए अध्यक्ष होण्याचं वृत्त फेटाळलं होतं. प्रसारमाध्यमांशी बोलताना शऱद पवार यांनी हे वृत्त चुकीचं असल्याचं म्हटलं बोकं. “ही बातमी तुम्ही दिली आहे, अशा खोट्या बातम्या देऊ नका,” असं शरद पवार यांनी प्रसारमाध्यांना उद्देशून म्हटलं होतं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment