पृथ्वीराज चव्हाण यांना दिल्लीतून बळ ; भाजपला थोपवण्यासाठी दिली ‘ही’ मोठी जबाबदारी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पक्षश्रेष्ठींनी पुन्हा एकदा बळ दिले आहे. आगामी आसाम निवडणुकीसाठीपृथ्वीराज चव्हाण यांना स्क्रीनिंग कमिटीचं अध्यक्षपद देण्यात आले आहे.

आसाम विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने कंबर कसली असून पृथ्वीराज चव्हाण यांच्या उमेदवार निवडणुकीसाठीची समिती अर्थात स्क्रीनिंग कमिटीचं अध्यक्षपद देण्यात आलं आहे. काँग्रेस नेते कमलेश्वर पटेल आणि दीपिका पांडे सिंह या समितीच्या सदस्या असतील.

आसामची निवडणूक 3 टप्प्यांत होणार आहे. पहिल्या टप्याचं मतदान 27 मार्चला होईल. दुसऱ्या टप्प्याचे मतदान 1 एप्रिल तर तिसऱ्या टप्प्याचं मतदान 6 एप्रिलला होईल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

You might also like