पंतप्रधानांनी शपथ घेतली कि संसद आत्महत्या करते; पृथ्वीराज चव्हाणांचे महत्वाचे विधान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांकडून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली जात असताना काँग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पार्लमेंटमधील पंतप्रधान यांच्या निवडीवरून महत्वाचे विधान केले आहे. “पार्लमेंटची निवडणूक झाली कि मोठा पक्ष आपला नेता निवडून देतात. तो पंतप्रधान होतो. त्या व्यक्तीने पंतप्रधान पदाची शपथ घेतली कि संसद आपली आत्महत्या करते. संसदेला काहीही अधिकार राहत नाहीत. आपल्या देशामध्ये जो अमेरिका इंगलंडमध्ये नाही तो पक्षांतर बंदी करण्याच्या कायद्याचा गैरवापर होऊ लागला आहे. त्यामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याचे महत्वपूर्ण विधान चव्हाण यांनी यावेळी केले.

कराड येथे जिल्हा काँग्रेस कमिटी कायदा विभागाच्यामार्फत आज स्व. अ‍ॅड. आनंदराव ऊर्फ दाजीसाहेब चव्हाण यांच्या स्मृतिप्रित्यर्थ विधी सल्ला शिबीर कार्यक्रम पार पडला. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी ते म्हणाले की, आपल्या देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेत अस्तित्वात असलेली कल्पना अंमलात मात्र, आणली गेलेली नाही. पार्लमेंटची निवडणूक लागली कि पक्ष आपला नेता निवडून देता. तो नेता निवडला कि त्याचा दुसऱ्या दिवशी शपथविधी होतो. तो पंतप्रधान होतो. त्या व्यक्तीने पंतप्रधान पदाची शपथ घेतली कि संसद आपली आत्महत्या करते. संसदेला काहीही अधिकार राहत नाहीत. फक्त त्या ठिकाणी लोकांनी जाऊन वेळ मिळाला तर बोलायचं. नाहीतर भत्ता घ्यायचा आणि घरी जायचं. कारण का तर आपल्या देशामध्ये जो अमेरिका इंगलंडमध्ये नाही तो पक्षांतर बदल करण्याचा आता वापर होऊ लागला असल्याचा आरोपही मोदी सरकारवर चव्हाण यांनी केला आहे.

सर्व संसद सदस्यांना आणि विधानसभेच्या आमदारांना थेट मुख्यमंत्र्यांचे अथवा सत्ताधारी पक्षांचे गुलाम अशाप्रकारे वागण्याची सुरुवात झाली आहे. हे मी विधान विचारपूर्वक करतोय कारण वीस वर्ष मी पार्लमेंटमध्ये घालवली आणि इथे दहा वर्ष झाली. त्यामुळे पक्षांतर्गत कायदे बंदी करायला पुनर्विचार करायला पाहिजे. फक्त त्याठिकाणी विश्वासदर्शक ठराव घेणे आवश्यक आहे. बाकी विधेयक मांडणं त्यावर मत प्रदर्शन करणे, विरोध करणे हे अधिकार दिलेले नाहीत. तर मग तुम्ही फक्त हात वर करायचा तो व्हिप आला कि. पक्षाने सांगितले कि तुम्ही या विधेयकावर अमुक अमुक सही करा कि संपलं. त्यामुळे एक पंतप्रधान आणि त्यांच्या अंतर्गत असणारे आयएएस अधिकारी ते सध्या सरकार चालवतात असल्याचे मत आमदार चव्हाण यांनी व्यक्त केले.

Leave a Comment