प्रत्येकवेळी पेट्रोल-डिझेलचे दर वाढवून भाजपने स्वतःच्या सुटकेस भरल्या- प्रियांका गांधी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली ।  जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दराने निचांकी स्तर गाठला आहे. अशा वेळी मोदी सरकारनं इंधनवर उत्पादन शुल्क वाढवण्याच्या निर्णय घेतला आहे. त्यामुळे कच्च्या तेलात झालेल्या घसरणीचा फायदा कोणालाही मिळणार नाही. मंगळवारी रात्रीपासून पेट्रोलवर १० रूपये तर डिझेलवर १३ रुपयाचे उत्पादन शुल्क वाढवण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. यावरून काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी भाजपावर कडाडून टीका केली आहे.

”कच्च्या तेलाच्या किंमतीत होणाऱ्या घसणीचा फायदा सामान्य लोकांना झाला पाहिजे. परंतु प्रत्येक वेळी भाजपा सरकार उत्पादन शुल्क वाढवून हा फायदा आपल्या सुटकेसमध्ये भरत आहे. जो पैसा मिळत आहे त्यातून मजुर, मध्यम वर्ग, शेतकरी आणि उद्योंगाना कोणताही फायदा मिळत नाही. अखेर सरकार एवढा पैसा कोणासाठी गोळा करत आहे,” असा सवाल प्रियांका गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये मोदी सरकारला केला आहे. दरम्यान प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जुना व्हिडीओ ट्विट करून त्यांनी दिलेल्या आश्वासनाची आठवण करून दिली आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं देशभरात लॉकडाउन लागू करण्यात आलं आहे. त्यामुळं अनेक उद्योगधंदे बंद असल्यानं अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम झाला आहे. केंद्राचे महसुलाचे स्रोत आटले आहेत. त्यामुळं महसूलासाठी केंद्र सरकारनं पेट्रोल व डिझेलच्या उत्पादन शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे. केंद्राच्या निर्णयानुसार पेट्रोलवर प्रति लिटर १० रुपये, तर डिझेलवर प्रति लिटर १३ रुपये उत्पादन शुल्क आकारले जाणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा भार तेल कंपन्यांवर पडणार आहे. त्यामुळे थेट सामान्य नागरिकांच्या खिशाला याची झळ सोसावी लागणार नाही असं सरकारमधील सूत्रांच म्हणणं आहे. केंद्र सरकारनं घेतलेला हा निर्णय ६ मे पासून लागू करण्यात आला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment