Tuesday, March 21, 2023

काँग्रेसला ‘अच्छे दिन’ आणण्यासाठी राहुल गांधीचं सक्षम नेते; सर्वेक्षणात भारतीयांची पंसती

- Advertisement -

नवी दिल्ली । देशातील राजकीय, आर्थिक, राष्ट्रीय सुरक्षा, कोरोना परिस्थितीसंदर्भात ‘इंडिया टुडे ग्रुप’ आणि ‘कार्वी इनसाइट्स’ने सर्वेक्षण केलं. ‘मूड ऑफ द नेशन २०२०’ (Mood of The Nation 2020) नावानं करण्यात आलेल्या पाहणीत काँग्रेसच्यासंदर्भातही प्रश्न विचारण्यात आला होता. “काँग्रेसला पुन्हा उभारी देण्यासाठी कोणता नेता योग्य आहे, असं तुम्हाला वाटतं?,” असा प्रश्न विचारण्यात आला असता सर्वेक्षणात सहभागी लोकांनी राहुल गांधी यांना पसंती दिली. हे सर्वेक्षण २१ डिसेंबर २०१९ ते ३१ डिसेंबर २०१९ दरम्यान करण्यात आलं. यामध्ये १९४ विधानसभा मतदारसंघ आणि ९७ लोकसभा मतदारसंघातील १२ हजार १४१ जणांना सहभागी करुन घेण्यात आलं होतं. यामध्ये शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागातील लोक सहभागी होते.

सर्वक्षणानुसार, काँग्रेसला अच्छे दिन आणण्यासाठी राहुल गांधी सक्षम नेते असल्याचे २३ टक्के लोकांना वाटतं असून दुसऱ्या क्रमांकावर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नावाला १८ टक्के लोकांनी पसंती दिली आहे. तर १४ टक्के लोकांनी माहिती नाही, असं उत्तर दिलं. विशेष म्हणजे या राहुल गांधी आणि मनमोहन सिंह यांच्या व्यतिरिक्त १४ टक्के लोकांना प्रियंका गांधी या काँग्रेसला उभारी देण्यासाठी योग्य नेत्या वाटत आहेत. दरम्यान, १४ लोकांना काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी काँग्रेसला पुन्हा सत्तेवर आणू शकतात.

- Advertisement -

दरम्यान, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसचा जनाधार घटला आहे. २०१४ आणि २०१९ लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला २ अंकी जागा मिळवता आल्या. या काळात काँग्रेससाठी दिलासादायक बाब म्हणजे, काही राज्यात काँग्रेसला सत्ता काबीज करण्यात यश मिळालं तर काही ठिकाणी राज्यात भागीदारीतून सत्तेत परत येता आलं. मात्र, ही सत्ता टिकवण्यासाठी काँग्रेसला धडपड करावी लागत आहे.यात त्याला काही ठिकाणी यश मिळत आहे तर काही ठिकाणी अपयश. महाराष्ट्र, राजस्थान, कर्नाटक, मध्यप्रदेश ही राज्य त्याची नजीकच्या काळातील उदाहरण आहे. तर दुसरीकडे काँग्रेसमध्ये बंडाळी माजलेली पाहायला मिळत आहे. ज्योतिरादित्य सिंधिया आणि सचिन पायलट यांच्या बंडखोरीनंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह सुरु असल्याचे समोर आलं आहे. या अशा संकट काळात संकटमोचन म्हणून कोण काँग्रेसला नवीन उभारी देण्यासाठी राहुल गांधी लोकांना योग्य वाटतं असल्याचे वरील सर्वेक्षणातून समोर आलं आहे. मात्र, काँग्रेसची पुढील वाट खडतर आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”