कोरोना लसीच्या बाबतीत मोदी सरकारचा निष्काळजीपणा चिंताजनक; राहुल गांधींची टीका

नवी दिल्ली । कोरोना महामारीने जगभरासह भारतातही थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. कोरोना रुग्ण वाढीचे रोज नवे विक्रम नोंदवले जात आहेत. गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल ७५,७६० नवे रुग्ण सापडले आहेत. तर १०२३ जणांनी आपले प्राण गमावले आहेत. त्यामुळे आता देशातील एकूण कोरोनाबिधांची संख्या ३३ लाखांपेक्षा अधिक झाली आहे. अशा वेळी देशातील जनता लसीच्याही प्रतीक्षेत आहे. यावरून आता काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

राहुल गांधी यांनी ट्विटरवरून मोदी सरकारवर हल्लाबोल करताना म्हणाले कि, “आतापर्यंत एक निष्पक्ष आणि सर्वसमावेशक कोविड लसीची रणनीती असायला हवी होती, परंतु अद्याप त्याचे कोणतेही चिन्ह दिसत नसून केंद्र सरकारचा निष्काळजीपणा चिंताजनक आहे.” यापूर्वीही राहुल गांधींनी कोरोना लसीच्या लसीकरणाबाबत नियोजनाबाबत १४ ऑगस्ट रोजी ट्वट केलं होतं. “भारत करोना लसीचं उत्पादन करणाऱ्या देशांपैकी एक असेल. परंतु ही लस सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी एक सर्वसमावेश रणनीती आखायला हवी,” असं राहुल गांधी म्हणाले होते.” असं राहुल गांधी म्हणाले.

दरम्यान, देशातील कोरोनाबाधितांच्या एकूण संख्येने आता ३३ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. देशभरातली करोनाबाधितांची एकूण संख्या आता ३३ लाख १० हजार २३५ वर पोहचली आहे. दरम्यान, देशात ७ लाख २५ हजार ९९१ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. तर २५ लाख २३ हजार ७७२ जणांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. तर दुसरीकडे आतापर्यंत एकू ६० हजार ४७२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”