Saturday, January 28, 2023

राज्यात सरकार बदलल्याने अण्णा ७ वर्षांच्या कुंभकर्णीय निद्रेतून खडबडून जागे झाले; काँग्रेसचा हल्लाबोल

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अजित पवार यांच्या मामाचा कारखाना असलेल्या जरंडेश्वर साखर कारखान्यावर ईडी ने कारवाई केल्यानंतर जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी अजित पवारांवर निशाणा साधला होता. अजित पवारांचं नाव आता आलं. आम्ही कधीपासून त्याबाबत बोलतोय. आता ईडीने लक्ष घातल्याने सर्व बाहेर पडेल, असा दावा अण्णा हजारे यांनी केला आहे. यानंतर काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी अण्णा हजारेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे

आम्ही फडणवीस सरकारमधील अनेक मंत्र्यांचे भ्रष्टाचार पुराव्यानिशी काढले. अण्णा हजारे यांची निद्रावस्था भंग झाली नाही. राफेलच्या आवाजाने, शेतकऱ्यांच्या आक्रोशाने, महागाईच्या वणव्यानेही ढिम्म हलले नाहीत राज्यात सरकार बदलले व अण्णा ७ वर्षांच्या कुंभकर्णीय निद्रेतून खडबडून जागे झाले असा टोला सचिन सावंत यांनी लगावला.

- Advertisement -

राफेलचे भूत मोदी सरकारच्या पाठीवरून उतरणार नाही. मोदी सरकारने हे प्रकरण आपल्या एकाधिकारशाहीतून चौकशी न करता गाडलं असलं तरी राफेलचे सापळे सध्या चौकीदारची ड्युटी संपेल याची वाट पाहत आहेत. बाहेर येतीलच असेही ते म्हणाले.

अण्णा हजारे नेमकं काय म्हणाले होते –

जरंडेश्वर प्रकरणात अजित पवार यांचं नाव आलं आहे. ते आम्ही कधीपासून बोलत आहे. पण मी फकीर माणूस. माझं कोण ऐकतोय. आता ईडीने लक्ष घातलं आहे. त्यातून सर्व बाहेर पडेल असा आम्हाला विश्वास आहे, असं हजारे म्हणाले. आता जरांडेश्वर काखान्यापासून चौकशीला सुरुवात झाली आहे. आता ईडीने 49 साखर कारखान्यांची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली.