भाजप सरकारकडून अनेकांविरोधात खोटे गुन्हे दाखल; काँग्रेस नेत्याचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रास देशात भाजपकडून अनेक प्रकारचे राजकारण केले जात आहे. मात्र, देशात भाजप सरकारकडून अनेकांविरोधात खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रकार केला गेला आहे. यावरून काँग्रेसचे नेते सलमान खुर्शीद यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. “भाजपा सरकारने अनेकांविरोधात खोटे गुन्हे दाखल केले आहेत. मात्र, हे यापुढे होऊ देणार नाही. या खोट्या तक्रारी मागे घेण्याचा आम्ही प्रयत्न करू,” असा हल्लाबोल खुर्शीद यांनी केला आहे.

उत्तर प्रदेशात सध्या भाजपकडून केल्या जात असलेल्या राजकारणावरून काँग्रेसचे नेते सलमान खुर्शीद यांनी भाजपवर निशाणा साधला. यावेळी खुर्शीद म्हणाले की, “भाजपा सरकारने अनेकांविरोधात खोटे गुन्हे दाखल करताना ज्या ठिकाणी कायद्याचा दुरुपयोग केलेला आहे. मग हे गुन्हे चकमकीचे असो किंवा बेकायदेशीरपद्धतीने घरे पाडण्याचे असो. आम्ही न्याय देण्यासाठी प्रयत्न करू.

यावेळी खुर्शीद यांनी प्रियंका गांधी यांच्या संदर्भात महत्वपूर्ण विधान केले आहे. यावेळी ते म्हणाले कि, प्रियंका गांधी यांच्याकडून लोकांच्या भेटीगाठी घेतलया जात आहेत. उत्तर प्रदेश एक उत्तम आणि पारदर्शक सरकारची स्थापना केली जाणार असल्याच्या त्या सांगत आहेत. “भविष्यामध्ये दिसून येईलच की कोण निवडणूक जिंकणार आहे. प्रियंका गांधींचा चेहरा हा योगींपेक्षा फार उत्तम आहे आणि हेच सत्य आहे” असे खुर्शीद म्हणाले.

You might also like