काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारणार का?; सुशील कुमार शिंदे म्हणाले…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस अध्यक्षपदाची जोरदार चर्चा सुरू असून महाराष्ट्रातुन सुशीलकुमार शिंदे यांचे नाव समोर येत आहे. दरम्यान याबाबत सुशीलकुमार शिंदे यांना विचारले असता त्यांनी सावध प्रतिक्रिया दिली. काँग्रेस अध्यक्ष पदासाठी आपल्या नावाची चर्चा होत आहे. तुम्हाला संधी मिळाली तर काँग्रेसचे नेतृत्व करणार का? या प्रश्नावर सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, “खरं म्हटलं तर मला काही माहिती नाही. आता काही सांगता येत नाही. ‘बाजारात तुरी आणि कशाला मारी’ या म्हणीचे त्यांनी उदहारण दिले.”

त्यावेळी त्यांनी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा दिला. हिंदुत्वाचा विचार करणारा, तसेच सर्व धर्माची भूमिका मांडणारा आणि महाराष्ट्र वाचवणारा थोर नेता म्हणजे बाळासाहेब” असे सुशीलकुमार शिंदे म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे सर्व जाती धर्माचे लोक जायचे. बाळासाहेब ठाकरे यांनी साबीर शेख या मुस्लिम व्यक्तीला आमदार आणि मंत्री देखील केले. हे बाळासाहेब सर्व धर्मीय होते, याचं उत्तम उदाहरण आहे.माझ्या दोन मुस्लिम अंगरक्षकांबरोबरही बाळासाहेबांच्या रात्री-बेरात्री गप्पा रंगायच्या ही आठवणही त्यांनी सांगितली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment