माजी काँग्रेस आमदाराच्या मुलाची कोविड सेंटरमधील नोडल अधिकारी डाॅक्टरला मारहाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

गडचिरोली: राज्यात कोरोनाने अक्षरशः थैमान घातले असताना त्याच कोरोना रूग्णांची अहोरात्र सेवा करणाऱ्या डॉ अभिजित मारबते यांना कॉंग्रेसचे माजी आमदार आनंदराव गेडाम यांचा मुलगा लारेन्स गेडाम याने थेट कोव्हीड सेंटर येथे जाऊन मारहाण केल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत असून या घटनेचा राज्यभरातून निषेध केला जात आहे.

अभिजीत मारबाते हे आदिवासी भागात वंचित नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात या भावनेतून मागील अनेक दिवसांपासून दिवसरात्र रुग्णेसवा करत आहेत. 12 मे 2021 रोजी देखील ते नियमितपणे आपलं काम करत होते. यावेळी सायंकाळी पावणेसात वाजता माजी आमदार आनंदराव गेडाम यांचा मुलगा आला आणि त्याने आपल्या घरी होम क्वारंटाईन असलेल्या नातेवाईकंसाठी गोळ्या मागितल्या. यानुसार डॉक्टरांनी आरोपीला गोळ्या दिल्या.

यावेळी अतिरिक्त गोळ्या देण्यावरून कर्मचारी आणि नोडल अधिकारी डॉ. अभिजित मारबते यांच्याशी त्यांची बाचाबाची झाली. त्यांनी डॉक्टरांना शिवीगाळ करत ते औषधं टेबलवर फेकले. तसेच औषधं देण्याची तुझी लायकी आहे का असं म्हणत घाणेरडी शिवीगाळ करत हल्ला केला. यावेळी आरोपी गेडामने आरमोरी उपकेंद्राचे नोडल अधिकारी असलेल्या मारबाते यांना मारहाण केली.

दरम्यान, या प्रकारानंतर डॉ. मारबते यांच्यासह आरोग्य कर्मचाऱ्यांनी पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दाखल केली. रात्री १० वाजेपर्यंत यासंदर्भात जबाब घेणे सुरुच होते. दरम्यान माजी आमदारपुत्र लॉरेन्स पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्यावर अजामीनपात्र गुन्हा दाखल केला जात असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिली.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment