एमआयएम, वंचित हे देशाची फाळणी करणारे पक्ष; आमदार प्रणिती शिंदेंचा हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी सरकारवर एमआयएम व वंचीत बहुजन आघाडीच्या नेत्यांकडून टीका केली जात आहे. दरम्यान एमआयएमच्या नेत्यांनीही काँग्रेसवर टीका केल्याने काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीवर हल्लाबोल केला. एमआयएम, वंचित हे दोन्ही पक्ष देशाची फाळणी करणारे आहेत, अशी टीका शिंदे यांनी केली आहे.

मराठा, ओबीसी आरक्षणाच्या मुद्यांवरून महाविकास आघाडी सरकारवर आघाडी सरकारमधील घटकपक्षांकडून जोरदार टीका होऊ लागली आहे. दरम्यान, संसदेच्या राज्यसभेत एमआयएमच्या नेत्यांनी ठाकरे सरकार व मोदी सरकारवर टीका केली. याचा समाचार आज एका कार्यक्रमात काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी घेतला. त्यांनी एमआयएम तसेच वंचित बहुजन आघाडीवर टीका केली. एमआयएम, वंचित हे दोन्ही पक्ष देशाची फाळणी करणारे आहेत. त्यासाठी ते उभे राहिले आहेत. भाजप नव्हता तेव्हा हे पक्ष नव्हते, असे शिंदे यांनी म्हंटले आहे.

राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर असल्याने आघाडी सरकारने इतर घटक पक्षांच्या आरक्षणाचा विचार करावा, अशी मागणी सध्या घटक पक्षातील नेत्यांकडून केली जात आहे. दरम्यान, राज्यातील खासदारांनी संसदेच्या अधिवेशनात मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा उचलून धरला. मात्र, इतर समाजाच्या आरक्षणाबाबत काहीच न बोलल्याने यावर एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीकडून आता टीका हाऊ लागली आहे.

Leave a Comment