काँग्रेस आमदारांच्या गाडीला भीषण अपघात ; कारचा झाला चक्काचूर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस आमदार डॉ. वजाहत मिर्झा यांच्या गाडीला अपघात झाला आहे. डॉ. वजाहत मिर्झा हे कुटुंबासह यवतमाळहून नागपूरकडे जात होते. यावेळी पांढरकवडा बायपासवर रात्री 9.30 वाजताच्या सुमारास त्यांच्या गाडीला अपघात झाला.या अपघातात दोन्ही गाड्यांचं मोठं नुकसान झालं, मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. (Congress MLC Dr Vajahat Mirza met with Car Accident in Yawatmal)

चाचा का ढाबा’ जवळ त्यांच्या गाडीला विरुद्ध दिशेने येणाऱ्या फोर्ड कारने धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती, की वाहनांचा अक्षरशः चुराडा झाला. अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

कोण आहेत डॉ. वजाहत मिर्झा?

डॉ. वजाहत मिर्झा हे यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आहेत. मिर्झा हे महाराष्ट्र विधानपरिषदेवरील आमदार आहेत. जुलै 2018 मध्ये काँग्रेसच्या तिकीटावर डॉ. वजाहत मिर्झा बिनविरोध आमदारपदी निवडून आले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like