व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

राहुल गांधींनी ‘त्या’ दोन बहिणींना दिलेले वचन केले असं पूर्ण

वायनाड । काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केरळमधील दोन बहिणींना गेल्या वर्षी दिलेले वचन पूर्ण केले. के.काव्या आणि कार्थिका या दोन बहिणींनी मागील वर्षी झालेल्या कवलपरा दुर्घटनेत कुटुंबीयांना गमावले होते. राहुल गांधी यांनी भेट घेऊन त्यांना नवीन घर देण्याचं आश्वासन दिले होते. राहुल गांधी यांनी आपलं आश्वासन पूर्ण करत या दोन्ही बहिणींना नव्या घराच्या चाव्या दिल्या आहेत. (Rahul Gandhi keep his words and handover key of new homes to Kerala Sisters)

केरळमध्ये मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात झालेल्या पावसादरम्यान डोंगराची दरड कोसळल्याने के. काव्या आणि कार्थिकाच्या संपूर्ण कुटुंबाला जीव गमवावा लागला होता. दोन्ही बहिणी होस्टेलमध्ये वास्तव्यास असल्यामुळे वाचल्या होत्या. या घटनेनंतर राहुल गांधींनी दोन्ही बहिणींची भेट घेत नवीन घराचे आश्वासन दिले होते. एका वर्षानंतर त्यांनी ते पूर्ण केले आहे. कवलपरा दुर्घटनेत एकूण 59 व्यक्तींना जीव गमवावा लागला होता. मुसळधार पावसानंतर डोंगराचा भाग कोसळला होता. या दरम्यान राहुल गांधींचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या वायनाडमध्येही दरड कोसळली होती. यात 17 जणांनी जीव गमावला होता.

Sisters orphaned in Kerala landslide get home from Congress leader Rahul  Gandhi | Deccan Herald

राहुल गांधी सध्या केरळमधील वायनाडच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आहेत. नऊ महिन्यानंतर गांधी त्यांच्या मतदारसंघात आले आहेत.मलाप्पुरम जिल्हाधिकारी कार्यालयातील कोरोना आढावा बैठकीला राहुल गांधींनी उपस्थिती लावली.राहुल गांधी वायनाड लोकसभा मतदारसंघातील कोरोना स्थितीचा आढावा घेणार आहेत. यासोबत ते निवडक नेत्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती वायनाड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आय.सी. बालकृष्णन यांनी दिली. ते आज वायनाड जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना आढावा बैठकीला उपस्थित राहणार आहेत. राहुल गांधींचा तीन दिवसीय दौरा बुधवारी संपणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”