Saturday, February 4, 2023

माझ्यावर पाळत ठेवली जात आहे; नाना पटोलेंचा खळबळजनक आरोप

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडी सरकारची सत्ता असली तरी काँग्रेसची नाराजी आणि स्वबळाची भाषा कायम आहे. यावरून महाविकास आघाडी मध्ये तणाव आहे का असा प्रश्न निर्माण झाला असतानाच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अजून 1 गंभीर आरोप केला आहे.

माझ्यावर पाळत ठेवली जात आहे असा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केला आहे. मी सातत्याने स्वभाबळाची भाषा केल्याने पायाखालची वाळू सरकली असून त्यामुळे माझ्यावर पाळत ठेवली जाते आहे असे नाना पटोले यांनी म्हंटल. लोणावळ्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांसमोर बोलताना पटोले यांनी हे खळबळजनक वक्तव्य केलंय.

- Advertisement -

सोनिया गांधी यांनी सांगितलेय आहे की, महाराष्ट्र काँग्रेसची भूमी आहे. आपल्याला तिथं सत्ता आणायची आहे. मी त्यांना आश्वासन देऊन आलो आहे. परंतु मला हे सुखानं जगू देणार नाहीत असेही नाना पटोले यांनी म्हंटल