भाजपच्या 2 मतदानांवर काँग्रेसचा आक्षेप; मतमोजणीला उशीर होण्याची शक्यता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधान परिषदेच्या १० जागांसाठी आज मतमोजणी पार पडली. सर्वच राजकीय पक्ष आणि अपक्ष आमदारांनी आपलं मत मतपेटीत टाकलं आहे. मात्र भाजपच्या २ मतांवर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. त्यामुळे मतमोजणी लांबण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भाजप आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या मतदानावर काँग्रेसचा आक्षेप आहे. गुप्त मतदान असताना या दोन्ही नेत्यांनी दुसऱ्याच्या हातात मतपत्रिका दिल्याचा दावा महाविकास आघाडीने केला आहे. मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप हे दोघेही आजारी असताना त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. हे दोन्ही आमदार सही करू शकत होते मग मतदानाला दुसऱ्याला का पाठवले? यावर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे.

दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावरून काँग्रेस वर हल्लाबोल केला आहे. काँग्रेसनं असंवेदनशीलतेचा कळस गाठला अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने घेतलेला आक्षेप निवडणूक अधिकारी १०० टक्के फेटाळेल असा दावा संजय कुटे यांनी केला आहे. त्यामुळे निवडणूक आयोग यावर काय निर्णय घेणार हे पाहावं लागेल.

Leave a Comment