Monday, February 6, 2023

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सरकारकडे इच्छाशक्ती आणि नेतृत्वाचा आरोप ; सोनिया गांधींचा मोदी सरकारवर गंभीर आरोप

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी रविवारी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना जनतेसाठी, सार्वजनिक प्रश्नांसाठी लढा देण्याच्या सूचना केल्या. लोकशाही सर्वात कठीण काळातून जात असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. पक्षाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर त्यांनी थेट हल्लाबोल केला.सरकारने केलेले कृषी कायदे हे काळे कायदे असल्याचंही त्यांनी सांगितलं. सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि काँग्रेस प्रदेश प्रभारी यांची बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी पक्षाच्या नेत्यांना आवाहन केलं.

पक्षात नव्या नियुक्त्या आणि फेरबदल केल्यानंतरची त्यांची ही पहिलीच बैठक होती. सोनिया गांधी पुढे म्हणाल्या, कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात केंद्र सरकार अपयशी ठरलं आहे. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सरकारकडे इच्छाशक्ती, नेतृत्व, नीती, नियत आणि योग्य दिशेचा अभाव आहे. अर्थव्यवस्था तळाला गेली असून या आधी असं कधीच झालं नव्हतं.

- Advertisement -

केंद्र सरकारच्या धोरणांविरुद्ध खंबीरपणे काँग्रेस लढणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. काही दिवसांपूर्वीच काँग्रेसमध्ये व्यापक फेरबदल करण्यात आले होते. वादग्रस्त पत्रावर सह्या करणाऱ्या अनेक नेत्यांना डावलण्यात आलं होतं. तर अनेक तरुण चेहेऱ्यांना संधी देण्यात आली होती. अध्यक्ष पदासाठी निवडणूक घ्यावी यासाठी काही नेत्यांनी सोनियांना पत्र लिहिलं होतं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’