गुजरात मॉडेल हे नेहमीच त्यांचा डेटा लपवून काम करतं; पृथ्वीराज चव्हाणांचा गंभीर आरोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गुजरात मध्ये गेल्यावर्षी १ मार्च ते १० मे या काळात तब्बल ५८ हजार डेथ सर्टिफिकेट दिली गेली तर यावर्षी देखील याच काळात तब्बल १ लाख २३ हजार सर्टिफिकेट दिली गेली आणि सरकार म्हणते की कोरोनामुळे ४२१८ मृत्यू झाला.असा खळबळजनक दावा गुजराती वृत्तपत्र असलेल्या दैनिक भास्कर म्हणून करण्यात आला आहे. यावरून काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी टीकास्त्र सोडलं आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांनी ट्विट करत म्हंटल की हे खूप भयंकर आहे.. 71 दिवसात तब्बल 1.23 लाख मृत्यू ..याचा अर्थ दिवसाला 1744 लोकांचा मृत्यू झाला. गुजरात मॉडेल हे नेहमीच त्यांचा डेटा लपवून आणि रिपोर्ट मध्ये फेरफार करत काम करत आहे. असा गंभीर आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. यावेळी त्यांनी गुजरात मधील विविध शहरातील कोरोना आकडेवारी आणि मृत्यूदर सुध्दा दाखवला.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी देखील याच मुद्द्यावरून भाजप वर निशाणा साधला. आव्हाड म्हणाले की गुजराती पेपर दिव्य भास्करची हि हेडलाईन आहे. गुजरातमध्ये गेल्यावर्षी १ मार्च ते १० मे मध्ये ५८ हजार डेथ सर्टिफिकेट दिली गेली. यंदा याच काळात तब्बल १ लाख २३ हजार सर्टिफिकेट दिली गेली. दुपट्टीहून अधिक! आणि सरकारी आकडे काय सांगतात? कोरोनामुळे ४२१८ मृत्यू झाले.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment