भाजपने विलासकाकांनाही अमिष दाखवलं , पण काका बळी पडले नाहीत ; पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड । अखेर आज साताऱ्यात कॉंग्रेसमधील दोन दिग्गज नेते पृथ्वीराज चव्हाण आणि विलासराव उंडाळकर यांच्यात मनोमिलन झाल्याचं चित्र पाहायला मिळला आहे. या दोन्ही बड्या नेत्यांमध्ये गेल्या तीस वर्षांपासून संघर्ष सुरू होता. दोघांच्याही राजकीय वैरामुळे अनेकदा काँग्रेसला फटका बसला होता. हे दोन्ही गट कॉंग्रेसच्या मेळाव्या निमित्त एकत्र आले आहेत. यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय समीकरण बदलणार आहेत.काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी काँग्रेसमध्ये सक्रीय होण्याचा निर्धार केला. यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपवर घणाघात केला.

“केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस या गुरु-चेल्याने राज्यातील दोन्ही काँग्रेसचे चाळीस नेते फोडले. तसेच राज्यातील नेते चंद्रकांत पाटील यांनीही काँग्रेस संपवण्यासाठी प्रयत्न केले, त्यात त्यांना यशही आलं. साताऱ्यात सुद्धा ज्या लोकांना आपण बळ दिलं, सहकारी संस्था स्थापन करण्यासाठी मदत केली ती लोक अजून काही मिळतंय का हे पाहण्यासाठी आणि आता काय काँग्रेस पक्ष सत्तेत येणार नाही हा विचार करून दुसऱ्या पक्षात गेले.असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.विलासकाका उंडाळकर यांनाही आमिष दाखवलं” विलासकाकांनाही आमिष दाखवले. काकांना स्वातंत्र्य सैनिकी परंपरा आहे. ते आमिषाला बळी पडले नाहीत” असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

कराड तालुक्यातील काँग्रेसचे नुकसान झाले तर प्रतिसाद संपुर्ण देशात होईल भाजपला वाटलं कारण या प्रीतिसंगमातून यशवंतरावानी राज्याला विचार दिला .ती काँग्रेस पुन्हा जुळणी करणे ही काळाची गरज आहे या विचाराने आम्ही एकत्र आलो आहोत, अस पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हंटल.

ते पुढे म्हणाले, उदयसिंह पाटील यांनीही मोठेपणा दाखवला.चला एकत्र येऊया आणि काँग्रेस बळकट करूया.तुम्ही सगळे युवा आहात.आपले सगळे कार्यकर्ते एकत्र काम करून कराडपासून सुरुवात करून सातारा जिल्ह्यामध्ये परिस्थिती बदलूया आणि आपण नक्कीच ही परिस्थिती बदलू अशी मला खात्री आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment